कविता न जमते मला ..!!

Poems 2 Comments »

आज कल काही
सुचते मला
लिहले काही तर ते
रुचते मला


दर्द भरे लिहावे
तर माला तसे काही बोचते
हसवावे म्हणालो तर
ते हसू तुमच्या ओठी पोहचते


जाता करुण रस लिहाया
दारूण पराभव होतो
रौद्र कळते मला
लिहले तर आर्जव होतो


शृंगार लिहाया जाता
ते ही भंगार होते
बिभत्स मी टाळतो
लिहितो ते बिभत्सात जाते


व्याकरणाचा मजला
कसला गंध कळतो
मग सगळे सोडू मी
मुक्तछंदाकडे वळतो


कविता जमते मला
शब्द मी सांडतो
जे काही जमते
ते फक्त आपल्या लोकात मांडतो

– दीप
दिांक १९/११/२००९
Tags: , ,

रडा-रड !!

Poems No Comments »

मी उठायचो
ती बसायची
मी हसायचो
ती रुसायची

मी इंग्लिश ऐकायचो
ती मराठी गाणी ऐकायची
मी action पाहायचो
ती DDLJ मध्ये रमायची

मी perfume दिला तर
ती गजरा आन म्हणायची
गजरा हातात दिला तर
केसात माळ म्हणायची

माळता येत नाही म्हणालो की
माझ्यावर चिडायची
वैताग आहे नुसता म्हणालो कि
रड रड रडायची

रात्री मधेच उठून
ती चारोळीचा sms पाठवायची
आणि नेमका त्याच वेळेस
मला एकही ओळ नाही आठवायची

मी blank sms पाठवला कि
ती माझ्यावर जाम चिडायची
आणि मग दुसर्या दिवशी फोन न उचलून
मला दिवसभर पिडायची

त्या दिवशी मग मी
एकटा होऊन राहायचो
आली असेल तिची चारोळी
म्हणून सारखा फोन पाहायचो

दुसर्या दिवशी पहाटेच तिचा फोन
असे काही तरी घडायचे
चुकले रे माझे सख्या
असे म्हणून तिनेच परत रडायचे

अश्या रडा-रडीला
कारणांची कमी नसते
कोणत्या गोष्टीवरून होईल भांडण
याची कधी हमी नसते

— दीप

Tags: ,

मन माझे माकड !!

Poems 2 Comments »

मन माझे
माकड
भित्र्यांसमोर शूर
शुरांसमोर भेकड

मन माझे माकड
नाही टिकत एका जागी
असलो जरी हावरा
दाखवतो स्वतःला वैरागी

टोपी चढवतो जरीची
आणि हातात घेतो काठी
आहे मी मस्त कलंदर
फक्त हे दाखवण्यासाठी

सजवले स्वतःला कितीही
घेतले जरी राजकुमाराचे सोंग
सत्याच्या आरशासमोर
करता येईना ढोंग

भासवतो जसा बाहेरून
तसा आतून मी नाही
याचे शल्य काही केल्या
मनातून जात नाही

जगा बरोबर करितो
स्वतःची ही फसवणूक
सुख नाही मनाला
फक्त वरवरची हसवणूक

– दीप
०२/०२/२०१०

Tags: , ,

मी साचलेलं पाण्याचं डबकं, ती झुळझुळ पाणी …!

Poems 8 Comments »

काल  मरून  मी स्वर्गात गेलो
इंद्र  नाराज  होता, रंभा  तर फारच  चिडलेली
एकंदरीत  चित्र चिंताग्रस्त
माझ्या कर्मकांडाची फ़ाईल स्वर्गात  हि  रखडलेली

इंद्र  म्हणाला प्रेम करायचा  प्रेम करायचा
म्हणून तू तिच्यावर किती रे  प्रेम करायचा
तुला प्रेम वाटता  वाटता
माझ्या प्रेमाचा  स्टोक मलाच  कमी पडायचा

ती तुझ्याकडे ढुंकून हि पाहत  नसली तरी
तू तिच्यासाठी  रात्रं-दिवस झुरायचास
तिने  पायाने  लवंडली  तरी
प्रेमाची  घागर  तू परत काठोकाठ  भरायचास

तिने  तुझ्याकडे  पाहिलं नसलं तरी
हि रंभा तुझ्या प्रेमाच  दररोज  live telecast पहायची
दयेलाही दया येईल असे तुझे प्रेम पाहून
हि रंभा ढसा ढसा रडायची

सौंदर्य नको अमरत्व नको
मी तुझ्या सारखा  प्रेम करेल असा वरदान मागायची
शिका  जरा  त्याच्याकडून
असा वरून  मलाच  गाल फुगवून सांगायची

येवढ माझा नाव घेतला असतास तर
मी हि तुला पावलो असतो
तुझ्या प्रत्येक संकटात मदतीला
स्वताहून धावलो असतो

येऊ दे तिला वर एकदा
सरळ तिला नरकातच  पाठवतो
बघतोच मग तिला
तू कसा नाही आठवतो

तसा म्हणताच  बोललो
म्हणालो ती नरकात जाणार  असेल
तर मलाही तिथेच पाठवशील
नरक हि मला तिथे स्वर्गाहून सुंदर भासेल

का म्हणून तिने
माझ्याकडे यायचं
तहानलेल्याने पाण्याकडे
का पाण्याने तहानालेल्याकडे जायचं ?

मी साधारण मनुष्य, ती रुपाची राणी
मी साचलेलं पाण्याचं डबकं, ती झुळझुळ पाणी
मी खोबरेल तेल, ती अत्तरदाणी
मी हिमेश चा ऊऊऊऊ, ती लताची गाणी
मी खुरटे केस, ती लांब सडक वेणी
मी आरे च दुध, ती शुध्द लोणी

असा बोलताच इंद्राने चक्क हात जोडले
सकाळच्या पहिल्या गाडीने परत पृथ्वीतलावर धाडले
म्हणाला माझ्या संसाराला आग लावायचा तुझं काही तरी कपट आहे
सांगून सुधारणार नाही असा तू कुत्र्याचा शेपूट आहे

तू साधारण असलास तरी
तरी तुझं प्रेम असाधारण आहे
तिन्ही जगावर मात करेल
असा तुझ्याकडे कारण आहे


दीप २१/०८/२००९

Tags: , ,

जीवनात ये ग राणी………..!

Poems 8 Comments »

ना मन तळ्यात रमत
न रमत मळ्यात
जीव माझा सखे अडकला
तुझ्या काळ्याभोर डोळ्यात

कधी मुकाट वाहत्या नदीत
कधी उनाड ओढ्यात
दिससी राणी तू मला
आकाशाच्या ग निळ्यात

मळयामंधी माझ्या
बहरली शेकडोनी फुले
वारा खोड काढीता ग त्यांची
मन माझे फुलासंगे डोले

मळयामंधी प्रत्येक फुलात राणी
चेहरा तुझा ग दिसतो
भान मग राहत कोणाला
आणि पाय चिखलात फसतो

गाईलाही मी आता
कशी आहे विचारितो
हातून चाबूक गळाला
बैलांना मी गोंजारीतो

काल बाजारात तुला परत पाहिली
भाळी शोभे चंद्रकोरी टिकली
काल कपाळावरून सटकली
निघाली तिथून सरळ काळजाला चिकटली

तुझ्यामुळे प्रिये आता
प्रत्येक ऋतू ग हिरवा
तूच नवसाने झालेला पाऊस
तूच शेतातला गारवा

जवळ ये ग तू आता
नको राहू दूर दूर
जवळ नसलीस तेंव्हा
उरी आठवणींचे काहूर

शेतात पिकवेल हिरे मोती
येवढा मनगटी माझ्या जोर
जीवनात ये ग राणी
कर जगणं हे थोर ..!

–दीप १५/०७/२००९

Tags: ,

म्हणून त्या कविता मी परत वाचत नाही…!

Poems 2 Comments »


निजण्याआधी तुज्यावर कविता करायच्या
हे तर आता रोजचंच झालंय
आणि याची कितीही सवय झाली आहे असं म्हटलं
तरी प्रत्येक वेळेस लिहिताना मला भरून आलंय

मी कविता का लिहितो
हे मला खरंच कळत नाही
कारण जिच्यासाठी मी त्या लिहितो
तिच्यापर्यंत त्या कधीच पोहोचत नाही
आणि मनाची परत घालमेल नको
म्हणून मी ही त्या परत वाचत नाही

तुला खरं वाटणार नाही
पण माझ्या कवितेचा प्रत्येक शब्द माझं काळीज जाळतो
तू माझ्या शब्दाकडे नीट पाहिलंस
तर तुलाही कळेल की
माझा प्रत्येक शब्द मूक अश्रू ढाळतो

माझ्या या कविता
मला कधीही न सुटलेलं कोडं आहे
अफाट दुखः दाबलय मनात
कवितेतून बाहेर आलेलं हे फक्त थोडं आहे

आज वाटलं की अश्रूंच्या शाईनेच कविता लिहावी
तसेही डोळ्यातून ते आज काल आटता-आटत नाही
हे ऐकून अश्रूही आज बोलले
म्हणाले, मनात घुसमट होते म्हणून बाहेर येतो
तर आता तुला तेही पटत नाही


दीपक इंगळे
दिनांक : १०-०६-२००९

Tags: ,

लक्षात राहील असा वाटलं नव्हत

Poems 1 Comment »

खूप बोललो असेल तुझ्यासोबत
सोबत हसलो पण असु खूप
बोलताना तुझ्या हळूवार मिटणार्‍या पापण्या
लक्षात राहील असा वाटलं नव्हत
  • कारण नसताना भांडायचं
    समजवला नाही की चिडायाचा
    डोळ्यासमोर येऊन कानामागे गेलेली केसांची बट
    लक्षात राहील असा वाटलं नव्हत

    कधी उगीच काही तरी चित्र काढायचो
    कधी तुझ्यासाठी काही तरी लिहायचो
    लिहून फाडून टाकलेल्या कविता
    जशयाच्या तश्या लक्षात राहतील असा वाटला नव्हत

    –दीपक इंगळे

    Tags: ,
    Designed by NattyWP Wordpress Themes.
    Images by desEXign.