“मयसभा”

Poems Add comments
“मयसभा” हा सुंदर थ्रेड मराठी कविता प्रेमी ओर्कुट कम्युनिटीवर सुरु आहे.. ते वाचून सुचलेला काही इथे टाकत आहे …
आज कल पिऊनही चढत नाही
पिऊन पिऊन पडलो जरी
तरी अशी एक हि आठवण नाही
जी लाटांसारखी परत परत येऊन काळजाला भिडत नाही


दारूला बेईमान म्हणू आता
की तुझ्या आठवणींना इमानी
शुद्ध राहत नाही कसली तरी
घुमत राहतात मनात तुझीच गाणी

मयखाण्यातला कल्लोळ
घोटागानिक पोटात जाणारे आगीचे लोळ
भान राहत नाही कशाचेच
पीत जातो पीत जातो
दारू मौज नाही राहत मग
जगायची गरज झालीये असा वाटते
कोणी तरी म्हणलेले आठवत राहते
साला, झहर हि झहर को काटता है !

— दीप

“मयसभा 2”

आज खरच एकदा पिउन पाहावि म्हन्तोय
घट्ट आवळून बसलेल्या दुख्खाना
बाजूला करून
त्यांच्यावर थोडसं हसावं म्हणतोय

ऐकलं होत की
ढोस ढोस ढोसली की सगळं काही विसरतं
डोळ्यासमोरच सत्य चित्र काही काळ धुसरत
नको ते गळून जातं
आणि मनाला पाहिजे तेच समोर पसरत

खरा सांगतो आज
दारुडा झालो याचा काडी मात्र गम नाही
फक्त एक गोष्ट सलतेय की एवढी ढोसली तरी साला
तिच्या एका आठवणीच्या नशेइतका इतका पण दम नाही

— दीप
दिनांक २१-०९-२०१०

Tags: , ,


2 Responses to ““मयसभा””

  1. Bhagyashree Says:

    Good one! nice pic too…

  2. Digvijay Says:

    APRATIM!!

Your comment plzzz

Designed by NattyWP Wordpress Themes.
Images by desEXign.