मी एकटा

Poems 12 Comments »

मी एकटा

मी एकटा

आजकाल मी एकटाच असतो
सगळ्यात असलो तरी कोणातच
नसतो

काही तरी आठवून मधेच हसतो
निळ्या आकाशात उडणार्‍या पतंगाकडे
तासन्-तास पाहत बसतो

कधी वाटता की पतंगासारखे एकटयानेच उडावे
आणि दोर तुटला की अनंतासोबत जुडावे

एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे
सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः
तेवढा वजा आहे

एकदा सवय झाली की एकटेपणा पण खाणार नाही
दिलं
जरी काही नाही एकटेपणाने, पण मला सोडून तरी जाणार नाही

Designed by NattyWP Wordpress Themes.
Images by desEXign.