म्हणून त्या कविता मी परत वाचत नाही…!

Poems 2 Comments »


निजण्याआधी तुज्यावर कविता करायच्या
हे तर आता रोजचंच झालंय
आणि याची कितीही सवय झाली आहे असं म्हटलं
तरी प्रत्येक वेळेस लिहिताना मला भरून आलंय

मी कविता का लिहितो
हे मला खरंच कळत नाही
कारण जिच्यासाठी मी त्या लिहितो
तिच्यापर्यंत त्या कधीच पोहोचत नाही
आणि मनाची परत घालमेल नको
म्हणून मी ही त्या परत वाचत नाही

तुला खरं वाटणार नाही
पण माझ्या कवितेचा प्रत्येक शब्द माझं काळीज जाळतो
तू माझ्या शब्दाकडे नीट पाहिलंस
तर तुलाही कळेल की
माझा प्रत्येक शब्द मूक अश्रू ढाळतो

माझ्या या कविता
मला कधीही न सुटलेलं कोडं आहे
अफाट दुखः दाबलय मनात
कवितेतून बाहेर आलेलं हे फक्त थोडं आहे

आज वाटलं की अश्रूंच्या शाईनेच कविता लिहावी
तसेही डोळ्यातून ते आज काल आटता-आटत नाही
हे ऐकून अश्रूही आज बोलले
म्हणाले, मनात घुसमट होते म्हणून बाहेर येतो
तर आता तुला तेही पटत नाही


दीपक इंगळे
दिनांक : १०-०६-२००९

Tags: ,

लक्षात राहील असा वाटलं नव्हत

Poems 1 Comment »

खूप बोललो असेल तुझ्यासोबत
सोबत हसलो पण असु खूप
बोलताना तुझ्या हळूवार मिटणार्‍या पापण्या
लक्षात राहील असा वाटलं नव्हत
  • कारण नसताना भांडायचं
    समजवला नाही की चिडायाचा
    डोळ्यासमोर येऊन कानामागे गेलेली केसांची बट
    लक्षात राहील असा वाटलं नव्हत

    कधी उगीच काही तरी चित्र काढायचो
    कधी तुझ्यासाठी काही तरी लिहायचो
    लिहून फाडून टाकलेल्या कविता
    जशयाच्या तश्या लक्षात राहतील असा वाटला नव्हत

    –दीपक इंगळे

    Tags: ,

    मी असा

    Poems 8 Comments »

    दिसतो तसा नाही मी
    डोळ्यात पाहशील तर कळेल तुला
    असतो तसा खरच नाही मी

    तुला निखळ हसताना पाहून मला हसू फुटाव
    चटका तुझ्या हाताला आणि टचकनं माझ्या डोळ्यात पाणी यावं
    ही जादू ती कसली हे विचारायला सांग मी कोठे जावं?

    खरं सांगू असा कधीच नव्हतो मी
    निखळता तारा पाहून मागितले की पाहिजे ते मिळते
    आता अशा गोष्टीवर पण विश्वास ठेवतो मी

    कूस बदलत पहाटे पर्यंत जागतो मी
    ज्या देवाला मानत नव्हतो
    आज-का त्याच्याकडेच तुला मागतो मी

    आकाशातले चांदणे पाहत कधी तरी निजतो
    छत्री घेऊन बाहेर पडणारा मी
    आता मुसळधार पावसात ओला चिंब भिजतो

    Tags:
    Designed by NattyWP Wordpress Themes.
    Images by desEXign.