मन माझे माकड !!

Poems 2 Comments »

मन माझे
माकड
भित्र्यांसमोर शूर
शुरांसमोर भेकड

मन माझे माकड
नाही टिकत एका जागी
असलो जरी हावरा
दाखवतो स्वतःला वैरागी

टोपी चढवतो जरीची
आणि हातात घेतो काठी
आहे मी मस्त कलंदर
फक्त हे दाखवण्यासाठी

सजवले स्वतःला कितीही
घेतले जरी राजकुमाराचे सोंग
सत्याच्या आरशासमोर
करता येईना ढोंग

भासवतो जसा बाहेरून
तसा आतून मी नाही
याचे शल्य काही केल्या
मनातून जात नाही

जगा बरोबर करितो
स्वतःची ही फसवणूक
सुख नाही मनाला
फक्त वरवरची हसवणूक

– दीप
०२/०२/२०१०

Tags: , ,
Designed by NattyWP Wordpress Themes.
Images by desEXign.