पाऊस म्हणजे…!!

Poems Add comments

Hirval

पाऊस म्हणजे …
परिसर भारावून टाकणारा,
मातीचा दरवळ
पाऊस म्हणजे …
नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली
मोहक हिरवळ
पाऊस म्हणजे
सर्वत्र पसरलेली
ती धुक्याची लाट
पाऊस म्हणजे
पांघरुनामधून निघू न वाटणारी
ती थंडगार पहाट
पाऊस म्हणजे …
गरम गरम तिखटसा
खमंग वडा-पाव
पाऊस म्हणजे कुरकुरीत खुसखुशीत भज्यावर
मारलेला ताव

Kid-Dancing-In-Rain

पाऊस म्हणजे
चिंब पावसात
उनाडक्या करणाऱ पोर
पाऊस म्हणजे बेधुंद होऊन
थुई थुई नाचणारा मोर
पाऊस म्हणजे
गडगडणारी ढग, लखलखनारी वीज
पाऊस म्हणजे
आपलं इवलस डोक बाहेर काढून
जग बघणार ते छोटुस बीज

hodi

पाऊस म्हणजे
कागदाच्या होड्या करून
पाण्यात सोडायचं ते बालिश जग
पाऊस म्हणजे
मजबूत बुन्द्ध्याच्या खोडाला लपेटून
वेलीने धरलेला तग
पाऊस म्हणजे  तू …………
तुझ्या सहवासातले ते दिवस
मनातली ती दृढ इच्छा की
तू माझा व्हावस
पाऊस म्हणजे  ….
तुझ्या आठवणींनी तयार केलेली
मनातली ती ओल
ऐकतच राहावं असे वाटत राहणारे
तुझे ते बोल

Chhatri-Paus

पाऊस म्हणजे​​
तुझं-माझं ते प्रेम फुललेलं
एका छत्रीत फिरताना जन्मभराच
ते नातं उमललेलं !!!
~ दीप
​१४/०७/२०१३


Tags: , ,


One Response to “पाऊस म्हणजे…!!”

  1. admin Says:

    Khup Chan kavita…. ani khup chaan presentation!!!

Your comment plzzz

Designed by NattyWP Wordpress Themes.
Images by desEXign.