पालखी !!

Poems Add comments

palakhi

 

वळणा-वळणावर आता
तुझी रे चाहूल
भक्तीने पडते पाऊल
पांडुरंगाकडे !!
मनाला पडली तुझी
​​अशी रे भूल
​अनवाणी पायाखाली मखमल
​वाटत असे !!​
भक्तीत राहिली
आता कसली न कसर
तहान भुकेचा विसर
तुझ्यापायी !!
नाही उनाची काळजी
ना पावसाची फिकर
ओठांत तुझ नामाचा जिकर
आनंद यात्रेत !!
मनात विठ्ठल
कणाकणात विठ्ठल
क्षणा-क्षणात साठलं
विठ्ठल प्रेम !!
​जरी मानतो मी
दगडात नसे देव
मनी ज्याच्या भाव
तो पांडुरंग असे !! ​
​~दीप
Tags: , ,


One Response to “पालखी !!”

  1. Archana Says:

    Nice one !!!

Your comment plzzz

Designed by NattyWP Wordpress Themes.
Images by desEXign.