“पावसाची कविता”

Poems Add comments

 

“पावसाची कविता”

 

पाऊस आला की हे असं होतं
मनात दडून बसलेल्या
कोंडून ठेवलेल्या भावनांमध्ये
कुजबुज सुरु होते
कुजबुज वाढत जाते
आणि त्याचा गलका होतो
आणि मग मी
मनाची कवाड उधडतो
शब्द बाहेर येतात
कागदावर उतरतात
आणि त्याची कविता होते
“पावसाची कविता”
मी त्याला नाव देतो ..!!


*******************************************************************************************


तू, मी आणि पाऊस


तू मिठीत असलीस की
पाऊस पाहण्याची मजाच काही और आहे
तू मिठीत असलीस ना की 
पावसाला पण जोर आहे

तू मी सोबत असलो की
पाऊस गडगडतो 
विजा कडकडतो
माझ्यावर मनोमन जळतो
पण त्यावर मी चिडत नाही 
आहेसच म्हणा तू अशी
त्याचा साहजिक राग मलाही कळतो

जेंव्हा तू  खिडकीतून हात बाहेर काढतेस
तेंव्हा तो थोडा शांत होतो
तुला पाऊस आवडतो 
या विचाराने तो थोडा निवांत होतो
तुझ्या हातावर पडणारे
ते पावसाचे थेंब मी पाहतो
तुझ्या हातावर थांबण्याची 
त्या प्रत्येक थेम्बालाही ओढ आहे
आणि हातावरून निसटला तरी 
तो प्रत्येक थेंब आता गोड आहे 

~ दीप 9 Responses to ““पावसाची कविता””

 1. Arti Says:

  Mast !

  “आणि हातावरून निसटला तरी तो प्रत्येक थेंब आता गोड आहे”

  Loved the last line very much 🙂

 2. dinesh Says:

  तू, मी आणि पाऊस
  Who is the “Tu” ?

 3. Yogesh Says:

  Sahi re deepak nahi kavi ‘Deep’

 4. Pallavi Says:

  Mast aahe kavita… My fav line : तुझ्या हातावर थांबण्याची
  त्या प्रत्येक थेम्बालाही ओढ आहे

 5. Smita Says:

  Khupach god kavita aahe 🙂

 6. Suyog Says:

  Farach chhan

 7. Madhavi Says:

  Very cute!!!while reading ur poems my expressions are just like
  ahhhhh
  wowwwwww
  so cuuuutee!!
  waiting for ur next post… 🙂

 8. sheldon Says:

  very very very very very very nice poem

 9. sheldon Says:

  it is the best poem

Your comment plzzz

Designed by NattyWP Wordpress Themes.
Images by desEXign.