अडीच पानाचे पत्र ..!!

Poems Add comments

तुझं ते पत्र
जपलेलं
पाकिटाच्या आतल्या कप्यात
अलगद लपलेलं

आज तेच काढून पुन्हा एकदा पाहत होतो
अक्षर जरासी पुसट झाली होती
मनात ठळक कोरली असली तरी

आज ती पुसट झालेली अक्षर
गिरवत आहे
प्रत्येक अक्षर किती ग सुबक , नक्षीकामासारखे
देव स्वताच्या कलाकृतीला काय कमी पडू देणार होता

माझ्या ३ पानाच्या पत्राचं ते पत्रोत्तर
आणि ते लिहिताना माझी झालेली तारांबळ
प्रिय, प्राणप्रिय की श्वास झालेली अशी तू
काय लिहणार होतो मी पहिली ओळ
थोडं लिहले कि पान फाडायाचो

कसा लिहिणार होतो १ पानात
मनातलं सगळं काही
१२ पानाचे झालेलं ते पत्र
शेवटी काटून छाटून अडीच पानाचं केल
तरी धाकधूक होतीच मनात
काही राहिला तर नाही
कळेल का मला काय म्हणायचे आहे ते
काळजातल्या भावनांची xerox काढता आली असती तर किती बरे झाले असते

तुझ्या हातात पत्र देताना थरथरलेला हात
आजही तसाच थरथरत आहे
तुझी अक्षरे गिरवताना

तू पत्रोत्तर लिहावस
बाकी मला काहीच नको
असेच काही तरी मागितले होते मी देवाकडे

तुझ ते पत्रोत्तर
२ ओळींचं
किती सुटसुटीत
तशी तू नव्हतीच कधी गुंतागुंतीची
त्या दोन ओळी
माझ्या पत्राच्या उरलेल्या अर्ध्या पानात तू लिहलेल्या

दीप,
मला विसरून जा

पत्रोत्तर हवं, बाकी काही नको
ऐकला होता देवाने माझ
अर्धे पान कमी पडले अजून मला वाटते
माझ्या तीन पानात तीच ती आहे
हे अर्धे पान रिकामे पाहून
तिला पटले नसेल बहुधा

तरी ती अक्षरे गिरवत आहे
ते पत्र वाचत आहे सारखे
एकंच विचार येत आहे मनात
तू पूर्णविराम द्यायचे विसरलीस की….
तुला तो द्यायचा नव्हता

— दीप
दिनांक २२/१२/२००९

Tags: , ,


5 Responses to “अडीच पानाचे पत्र ..!!”

 1. Tani Says:

  tooooooo good Deep……..[:)][:)]

 2. Supriya Says:

  Khupach chhan lihle aahes.. wachun dolyat pani aale mazya…

 3. Akshu Says:

  छान आहे.सिनेमा पहावा तशी डोळ्यासमॊर चित्र उभी राहिली.

 4. Pallavi Says:

  Tashi purn Kavita ch khup sundar aahe. Pan ‘Bhavananchi Xerox’.. its tooooooooo good.

 5. abhijeet kulkarni Says:

  deepak yaar shabda nahiyet ek number…..

Your comment plzzz

Designed by NattyWP Wordpress Themes.
Images by desEXign.