म्हणून त्या कविता मी परत वाचत नाही…!

Poems Add comments


निजण्याआधी तुज्यावर कविता करायच्या
हे तर आता रोजचंच झालंय
आणि याची कितीही सवय झाली आहे असं म्हटलं
तरी प्रत्येक वेळेस लिहिताना मला भरून आलंय

मी कविता का लिहितो
हे मला खरंच कळत नाही
कारण जिच्यासाठी मी त्या लिहितो
तिच्यापर्यंत त्या कधीच पोहोचत नाही
आणि मनाची परत घालमेल नको
म्हणून मी ही त्या परत वाचत नाही

तुला खरं वाटणार नाही
पण माझ्या कवितेचा प्रत्येक शब्द माझं काळीज जाळतो
तू माझ्या शब्दाकडे नीट पाहिलंस
तर तुलाही कळेल की
माझा प्रत्येक शब्द मूक अश्रू ढाळतो

माझ्या या कविता
मला कधीही न सुटलेलं कोडं आहे
अफाट दुखः दाबलय मनात
कवितेतून बाहेर आलेलं हे फक्त थोडं आहे

आज वाटलं की अश्रूंच्या शाईनेच कविता लिहावी
तसेही डोळ्यातून ते आज काल आटता-आटत नाही
हे ऐकून अश्रूही आज बोलले
म्हणाले, मनात घुसमट होते म्हणून बाहेर येतो
तर आता तुला तेही पटत नाही


दीपक इंगळे
दिनांक : १०-०६-२००९

Tags: ,


4 Responses to “म्हणून त्या कविता मी परत वाचत नाही…!”

 1. Rajesh Pradhan Says:

  तुझ्या या कविता
  हे तर आता रोजचंच झालंय
  तर आता तुला तेही पटत नाही……

  तुला खरं वाटणार नाही
  पण त्या कोणी वाचत नाही
  तर आता तुला तेही पटत नाही……
  ……..राजू

 2. Lahu Mamale. Says:

  मी कविता का लिहितो
  हे मला खरंच कळत नाही
  कारण जिच्यासाठी मी त्या लिहितो
  तिच्यापर्यंत त्या कधीच पोहोचत नाही
  आणि मनाची परत घालमेल नको
  म्हणून मी ही त्या परत वाचत नाही hi kavita mala khup avaadali.

 3. Rohit Says:

  kharach chaan manapasun aavadli
  mala agdi college chi aathavan aali
  8097351278

 4. Dnyanesh Says:

  Jinkalas mitra….

Your comment plzzz

Designed by NattyWP Wordpress Themes.
Images by desEXign.