कशी आहेस ग तू ?
मी शेवटच पहिल होतं अगदी तशीच का ?
अजूनही करतेस का चाळा
चेहऱ्यासमोर आलेल्या केसांच्या बटांशी ?
अजूनही मारतेस का गप्पा
अथांग निळ्या समुद्राच्या लाटांशी ?
अजूनही का ग पिंजरयातल्या चीमण्यात रमते तुझे वेडे मन ?
मंदिराजवळच्या झाडाला पाहून येते का ग तुला माझी आठवण ?
आज काल मीही एकांतात कमीच बसतो
कारण एकांतात तुला विसरायचय याचाच मुळी मला विसर पडतो
तरी तुझी छबी आता बरीच धूसर झाल्यासारखी वाटते
पण तुझ्या आठवणींचा ओलावा अजुनही तसाच
अगदी कालच सगळ काही घडल्यासारखा
सगळं संपलं तरी
मागे बराच काही उरल्यासारखा
दगड झालेल्या काळजात
कायमस्वरूपी कोरल्या सारखा
तप्त उन्हात फुललेल्या
पर्णहीन गुलमोहरासारखा
—- दीपक इंगळे दि. ४/५/२००९

Nice One !!!!!!!
sundar !!! Tila majha Hi bolshil
Sunderch re deep..!!!
Chan mandalya ahes bhavana…..!!
Sahi ye ekdam mast
आज काल मीही एकांतात कमीच बसतो
कारण एकांतात तुला विसरायचय याचाच मुळी मला विसर पडतो
Chan
mastach..
कशी आहेस ग तू ?
Prachand chaan bhavana aahet
Superb