Dec 12
दिसतो तसा नाही मी
डोळ्यात पाहशील तर कळेल तुला
असतो तसा खरच नाही मी
तुला निखळ हसताना पाहून मला हसू फुटाव
चटका तुझ्या हाताला आणि टचकनं माझ्या डोळ्यात पाणी यावं
ही जादू ती कसली हे विचारायला सांग मी कोठे जावं?
खरं सांगू असा कधीच नव्हतो मी
निखळता तारा पाहून मागितले की पाहिजे ते मिळते
आता अशा गोष्टीवर पण विश्वास ठेवतो मी
कूस बदलत पहाटे पर्यंत जागतो मी
ज्या देवाला मानत नव्हतो
आज-काल त्याच्याकडेच तुला मागतो मी
आकाशातले चांदणे पाहत कधी तरी निजतो
छत्री घेऊन बाहेर पडणारा मी
आता मुसळधार पावसात ओला चिंब भिजतो

Hi!!!!
Kharach khup chhan ahe.
Wonderful poem dear…May I know from where u r taking the inspiration?
Pic is also too good.
Waha Waha …
Aab to tu mahir….. ho gaya he…..
Anu malik ki tarha….kis bat me….
malum he,……..tuze.
Last two lines are awesome.
Viru…..Bhai
1 Dum Mast…….
Tu pan SUMADIT….. SUMADIT…..
Wow….its so nice…तुमचा ब्लॉग व कविता दोन्ही ही आवडल्या….छानच…
एकदम मस्त लिहिले आहेस दीप [:)]
खूप छान झाली आहे कविता ….:):)
खास करून या ओळी खूप आवडल्या……
तुला निखळ हसताना पाहून मला हसू फुटाव
चटका तुझ्या हाताला आणि टचकनं माझ्या डोळ्यात पाणी यावं
ही जादू ती कसली हे विचारायला सांग मी कोठे जावं?